ब्रेकिंग न्यूज

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत पातळीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा भत्ता का थांबवला

 चिखली – कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर कोरोना काळात आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका व मदतनिस आणि अर्धवेळ स्त्री परिचारिका यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता लोकांमध्ये जनजागृती, आरोग्याची काळजी घेणे, महाआयुध सर्वे करणे, स्थलांतरीताचा सर्व करणे, कोविड-१९ निगडीत सर्व कामे अहोरात्र मेहनत घेऊन केलीत, त्याची दखल जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने सुध्दा घेतली. या केलेल्या कामाचा मोबदला आम्हाला मिळावा म्हणून आमच्या संघटनेच्या वतीने वेळोवेळी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला. त्याचा परिणाम म्हणून एप्रिल २०२० ह्या एका महिन्याचा कोरोना भत्ता सुध्दा ग्रामपंचायत पातळीवर देण्यात आला. परंतु त्यांनतर मात्र २३ महिन्याच्या कोरोना भत्ता अद्यापही थकीत आहे.आपण देखील पाच विषयाच्या अनुषंगाने दि.१३/१०/२०२५ रोजी मा. उपसचिव, महाराष्ट्र शासन यांच्या ४ जून २०२० च्या पत्राचा आधार घेऊन ग्रामपंचायत स्तरावर काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांना २३ महिन्यांचा थकीत असलेला कोरोना भत्ता संबंधित ग्रामपंचायत कार्यालयाने अदा करावा अशा प्रकारचे पत्र क्र.बुजिप/साप्रचि/ग्रापंअनुदान/३८४३/२०२५, दिनांक १३/१०/२०२५ नुसार संबंधित कर्मचा-यांना देण्यात यावे असे निर्देशित केले आहे. परंतु त्यामध्ये आपल्या पत्रात प्रत्यक्ष कोरोनामधी काम केलेल्या वर्कर्स, अंगणवाडी सेविका व मदतनिस आणि अर्थवेळ स्त्री परिचारिका यांचा उल्लेख नसल्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयाकडून या कर्मचा-यांना सदर थकीत कोरोना भत्ता देण्यास टाळाटाळ केल्या जात आहे. त्यासाठी संघटनेच्या वतीने जिल्हयातील प्रत्येक पंचायत समिती कार्यालयासमोर जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचारी, मदतनीस, आशा व गटप्रवर्तक आणि अर्धवेळ स्त्री परिचारिका यांनी आज चिखली पंचायत समिती येथे धरणे आंदोलन केले आहेत. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात महिला कर्मचारी आल्या होत्या. जिल्हयातील ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या आशा वर्कर्स व गटप्रवर्तक, अंगणवाडी सेविका व मदतनिस आणि अर्धवेळ स्त्री परिचारिका यांना २३ महिन्यांचा थकीत कोरोना भत्ता देण्यात यावा. अंगणवाडी कर्मचा-यांना अंगणवाडी कामाच्या व्यतिरिक्त काम देण्यात येवू नये. आशा वर्कर्सला ऑनलाईन कामाची सक्ती करण्यात येवू नये.. आरोग्य वर्धिनीचा मोबदला सर्वाना देण्यात यावा. अर्धवेळ स्त्री परिचारिकांना गणवेश देण्यात यावा. अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

फारुख शेख

मुख्य संपादक Star Tv 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!