क्राईम

जन्मदात्या पित्यासह काका व आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

तेल्हारा – ( अकोला )जन्मदात्या पित्यासह काका व आजोबांनी १२ वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा संतापजनक प्रकार अकोला जिल्ह्याच्या तेल्हारा तालुक्यातील एका गावात घडला. वडील, काकासह शेजारच्या आजोबाने हे दुष्कृत्य केले. या प्रकरणी तेल्हारा पोलिसांनी रात्री उशीरा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे. नाते व माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. समाजामध्ये महिला, तरुणी व चिमुकल्या मुलींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. आता तर घरात देखील मुली सुरक्षित नसल्याचे अकोला जिल्ह्यातील घटनेवरून समोर आले आहे. तेल्हारा तालुक्यातील एका गावातून धक्कादायक प्रकार समोर आला. पोटच्या १२ वर्षीय मुलीवर तिचा जन्मदाता पिता, काका व शेजारच्या आजोबाकडून गेल्या काही महिन्यांपासून लैंगिक अत्याचार केले जात होते. त्रास असह्य झाल्याने मुलीने शाळेतील शिक्षकांसमोर तिच्या सोबत घडलेला प्रकार सांगितला. हा प्रकार ऐकून शिक्षकांच्या पायाखालची वाळूच सरकली. सर्वांना मोठा धक्का बसला. शाळेच्या मुख्याध्यापकांकडून चाईल्ड हेल्पलाईनला माहिती देण्यात आली. चाईल्ड लाईनच्या महिला अधिकाऱ्यांकडून शाळेतील विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन, समुपदेशन करण्यात आले. मुलीसोबत घडलेल्या धक्कादायक प्रकार प्रकरणी चाईल्ड लाईन आणि शाळेतील मुख्याध्यापकांनी तेल्हारा पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून मुख्याध्यापकाच्या तक्रारीनंतर वडील, काका आणि शेजारी राहणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकावर गुन्हा दाखल केला. कलम ६४ (२) (एफ), (एम), ६५ (१) बीएनएस सह ४, ६, ८ बाल संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात आरोपी वडील आणि शेजारी राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला अटक केली आहे. नराधम काका हा फरार आहे. अल्पवयीन मुलीचे वारंवार लैंगिक शोषण केल्याने तीव्र रोष व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी तेल्हारा पोलीस पुढील तपास करीत आहे. राज्यात महिला अत्याचाराच्या घटना थांबताना दिसत नाही. रोज वेगवेगळ्या ठिकाणच्या घटना समोर येत आहेत, यात अल्पवयीन, भोळ्याभाबड्या मुलींवरील अत्याचार जास्त प्रमाणात दिसतात. घरातील पित्या, काकासह शेजारच्या आजोबाने १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याची खळबळजनक घटना शिक्षकाकडे केलेल्या तक्रारीनंतर समोर आली. महिला, तरुणी व आता चिमुकल्या मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा चव्हाट्यावर आला आहे.

फारुख शेख

मुख्य संपादक Star Tv 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!