नात्यातील युवकानेच तोडले अब्रूचे लचके, आमिष व धमकी देत मुलीवर अत्याचार

बुलडाणा – स्त्री अत्याचारासाठी रांझ्याच्या पाटलाला कठोर शिक्षा देणाऱ्या राजमाता जिजाउंचे माहेर असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा परिसर एका निर्घृण आणि घृणास्पद घटनेने हादरून गेला आहे. नात्याला काळिमा फासणाऱ्या एका वासनांध युवकाने नात्यातील एका अल्पवयीन मुलीची अब्रू लुटली. भेटवस्तू व चॉकलेट चे आमिष दाखवून आणि लहान भावाला ठार मारण्याची धमकी देत या नराधमाने जेमतेम चौदा वर्षीय बालिकेवर दोनदा शारीरिक अत्याचार केले. बुधवारी, १० डिसेंबर रोजी पीडिताने वडिलांसह जाऊन रीतसर लेखी तक्रार दिल्यावर साखरखेर्डा पोलिसांनी आरोपी युवकाविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहे. साखरखेर्डा पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या गोरेगांव येथील बत्तीस वर्षीय आरोपी हा पीडितेच्या जवळच्या नात्यातील आहे. पीडितेच्या लहान भावास भावास जीवे मारण्याची धमकी देत धमकी भेटवस्तूचे आमिष दाखवून त्याने नात्यातील अल्पवयिन मुलीवर जबरदसतिने लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणी पीड़ित मुलीच्या तक्रारी वरुण गोरेगांव येथील रहिवासी रोहीत तेजराव गवई (वय ३२ वर्ष राहणार गोरेगांव तालुका सिंदखेड राजा, जिल्हा बुलडाणा)याने पीड़ित अल्पवयिन मुलिस चौदा वर्षीय बालिकेला आपल्या जाळ्यात ओढले. तिला आमिष व दहशतच्या बळावरआणि स्वतःचा हात कापून घेतो असे सांगून परिसरातील लव्हाळा फाटा व कोलवड येथे नेऊन दोन वेळा जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. आरोपी पीडितेचा नातेवाईक असल्याने त्याला पीडितेला जाळ्यात ओढने सोपे गेले. मुलगी अल्पवीन असल्याचे माहिती असताना देखील तत्याने तीन डिसेंबर आणि ५ डिसेंबर रोजी तिच्यावर अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. पीडित मुलीचे वडिलांना आरोपी तसेच पीडित मुलीचे संबंध समजल्याने त्यांनी पीडित मुलीस खडसावून विचारले असता पीडितेने सर्व हकीकत सांगीतली. बुधवारी पीडित मुलगी आणि तिची आई वडील यांनी सोबत साखरखेर्डा पोलीस ठाणे गाठले. आरोपी रोहित गवई विरुद्ध विरुद्ध साखरखेर्डा पोलिसांनी भारतीय न्याय सहीता २०२३ चे कलम- ६४(फ),६५(1),६८(अ),३५१(२), ३५२ आणि लैंगिक अपराधा पासुन बालकांचे संरक्षण अधिकार (पोक्ससो) चे सह कलम ३, ४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा तपास तपास सहायक पोलीस निरीक्षक ठाणेदार गजानन करेवाड हे करीत आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात तपास करण्यात येत आहे.



