ब्रेकिंग न्यूज

बिअरचा ट्रक उलटला, बिअरच्या बाटल्या गोळा करायला लोक गोण्या घेऊन पोहोचले

छत्रपती संभाजीनगरमध्ये बिअरच्या पेट्यांनी भरलेला ट्रक डिलिव्हरीसाठी जात असताना अचानक पलटला आहे. वाळूज येथील रांजणगाव फाटा परिसरात ही घटना घडली आहे. त्यानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात या बाटल्यांचा खच बघायला मिळाला. विशेष म्हणजे यावेळी जखमी ड्रायव्हरकडे दुर्लक्ष करत मद्यप्रेमींची थेट बाटल्या गोळा करण्यासाठी धडपड बघायला मिळाली. याचा व्हिडीओही आता सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा ट्रक बिअरची डिलिव्हरी देण्यासाठी जात होता. यावेळी अचानक एक व्यक्ती आडवी आली. त्या व्यक्तीला वाचण्याचा प्रयत्नात ड्रायव्हरने जोरात स्टेअरिंक फिरवलं. मात्र, त्यानंतर त्याचं ट्रकवरील नियंत्रण सुटलं आणि ट्रक पलटी झाला. त्यामुळे ट्रकमध्ये असलेल्या बिअरच्या बाटल्यांच्या पेट्या रस्त्यावर विखुरल्या. यापैकी बऱ्याच बाटल्या फुटल्याने मोठं नुकसानही झालं. बिअरचा ट्रक पलटी झाल्याची बातमी समजताच आजुबाजुच्या परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी पोहोचत बिअरच्या बाटल्या गोळा करणं सुरु केलं. काही नागरिक तर चक्क गोण्या घेऊन या ठिकाणी दाखल झाले. महत्त्वाचे म्हणजे या घटनेत ड्रायव्हर जखमी झाला. तो कॅबिनमध्ये फसला होता. मात्र, त्याला कुणीही वाचवण्यात प्रयत्न केला नाही. प्रत्येकजण बिअरच्या बाटल्या गोळा करण्यासाठी धडपडत होता. दरम्यान, काही मिनिटातच पोलीस या ठिकाणी पोहोचले त्यांनी तत्काळ परिस्थिती नियंत्रणात आणत मद्यप्रेमांनी इथून हाकलून लावलं. तसेच ड्रायव्हरला रुग्णालयात दाखल केलं. या बाटल्या रस्तावरच फुटल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणात काचेचे तुकडे आणि बियर सांडल्याचे चित्र दिसत होते. त्यामुळे रस्त्यावर बिअरचा वास पसरला होता. यावेळी नागरिकांनी अपघातग्रस्त ट्रकमधील पडलेले बिअरचे बॉक्स तसेच शेकडो बॉटल्स पळवल्या..

फारुख शेख

मुख्य संपादक Star Tv 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!