क्राईम

युवकाने ज्वेलरी दुकानातून सोन्याच्या 3 साखळ्या उचलल्या अन् झाला पसार

क्षणात झालं होत्याचं नव्हत! सोनाराच्या दुकानात ग्राहक बनून घुसला, तीन सोन्याच्या चेन घेऊन पळाला

औरंगाबाद – अलीकडच्या काळात दुकाने आणि बाजारपेठांमध्ये चोऱ्यांचे प्रकार झपाट्याने वाढत आहेत. चोरटे आता नवनवीन युक्त्या वापरत असल्याने सर्वसामान्य व्यापारी आणि दुकानदार अधिकच चिंतेत आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार घडला. एका सोनाराच्या दुकानात ग्राहक बनून आलेल्या एका युवकाने विश्वास जिंकून क्षणात चोरीचा प्रयत्न केला आहे. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, त्या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. इथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने सध्या सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे. ”दुकान आमचे, विश्वास तुमचा’ या टॅगलाइनने ओळखल्या जाणाऱ्या एका सोनाराच्या दुकानात ग्राहक बनून आलेल्या एका युवकाने दुकानदाराचा विश्वास जिंकला आणि काही क्षणांत सोन्याच्या तीन चेन घेऊन तो पळाला. दुकानमालकासाठी हा प्रसंग इतका अनपेक्षित होता की, तो काही क्षण स्तब्ध झाला. संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाली असून, व्हिडीओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका प्रसिद्ध सोनाराच्या दुकानातील आहे. दुकानात आलेल्या एका संशयित ग्राहकाने सोन्याच्या चेन पाहण्याच्या कारणाने दुकानदाराचा विश्वास जिंकला आणि अचानक तीन चेन घेऊन दुकानाबाहेर पळ काढला. संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत अगदी स्पष्ट दिसतोय. व्हिडीओच्या सुरुवातीला एक सामान्य ग्राहकासारखा दिसणारा युवक दुकानात प्रवेश करताना दिसतो. तो आरामात बसून दुकानदाराला सोन्याच्या चेन पाहायला देण्यास सांगतो. दुकानदारही निश्चिंतपणे ट्रेमध्ये काही चेन काढून, त्याच्यासमोर ठेवतो. मग युवक त्या चेन शांतपणे आणि बारकाईने पाहतो, किमतीबद्दलही जणू तो खरेदी करणारच आहे अशा आविर्भावात विचारणा करतो. पण, काही क्षणांतच परिस्थिती बदलते. अचानक तो संधी साधून ट्रेमधून सोन्याच्या तीन चेन झटपट उचलतो आणि दुकानाबाहेर धावत सुटतो. दुकानदार त्या अचानक घडलेल्या घटनेने एकदम अवाक् होऊन जातो आणि काही क्षण त्याला काय करावे ह न सुचल्याने तो जागेवरून हलतच नाही. त्यानंतर तो दोन्ही हातांनी आपले डोके पकडून बसला असल्याचे व्हिडीओमध्ये दिसते. दुकानातील कर्मचारी त्याच्यामागे दुकानाबाहेर धावतोही; पण तोपर्यंत तो चोर बऱ्याच लांब अंतरावर तो निघून गेल्याचे दिसते. हा व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावर लोकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी आश्चर्य व्यक्त करीत म्हटले, “ग्राहक बनून असे लोक दुकानात येतात आणि सहज फसवतात.” काहींनी दुकानदाराची स्थिती पाहून, सहानुभूती व्यक्त केली. तर काहींनी, दुकानात अधिक सुरक्षा ठेवण्याचा सल्ला दिला.अनेकांनी हा प्रकार पाहून सावधानतेचा इशारा देत इतर ज्वेलर्सना सतर्क राहण्याचे आवाहन केले. या संपूर्ण घटनेनंतर दुकानदाराने तत्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली असून, सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे. शहरात या व्हिडीओमुळे मोठी चर्चा रंगली आहे.

फारुख शेख

मुख्य संपादक Star Tv 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!