शैक्षणीक

विद्येचे धडे देणाऱ्या शिक्षकाचा शाळेत मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा

नांदेड ( शेकापूर ) – माहूर तालुक्यातील शेकापूर येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने दारू पिऊन चक्क शाळेतच धिंगाणा घालताना विद्यार्थ्यांसोबतही गैरवर्तन केल्याचा खळबळजनक प्रकार शनिवाररोजी घडला असून शिक्षकी पेशाला काळीमा फासणा-या या दारूड्या शिक्षकाला निलंबित करून त्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी ग्रामस्थ पालकांकडून करण्यात आली आहे. माहूर तालुक्यातील मौजे शेकापूर येथील जिल्हा परिषद शाळेत कर्तव्यावर असलेले शिक्षक अनंत वर्मा यांचा शेकापूर येथील जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेतील गैरवर्तनाचा अत्यंत धक्कादायक व्हिडिओ समाजमाध्यमांवर फिरत असून सदरचा व्हिडीओ ५ डिसेंबर रोजीचा असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान प्राप्त माहितीनुसार शेकापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक अनंत वर्मा हे नेहेमीप्रमाणेच ५ डिसेंबर रोजीही शाळेत दारूच्या नशेत आले होते, त्यावेळी वर्गामध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांना शिकवण्याऐवजी त्यांच्याशी कथितरित्या अश्लील भाषेत बोलत होते. अधून मधून विद्यार्थ्यांच्या अंगावर धावून जात विचित्र डान्स करत होते. ही सर्व बाब समाध्यमांवर फिरत असलेल्या व्हिडीओत स्पष्ट दिसत असून शिक्षकाच्या अशा अवस्थेने शाळेतील विद्यार्थी देखील प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत दिसत आहेत. दरम्यान लाखो रुपयांचा पगार घेणारा दारूडा शिक्षक अनंत वर्मा हा विद्यार्थ्यांना शिक्षण न देता वर्गात दारू पिऊन येत असल्याच्या गंभीर प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर येवून ठेपला असून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याऐवजी कर्तव्यावर असताना शाळेत अश्लिल हातवारे करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक स्वास्थ्य बिघडविण्यासोबतच शैक्षणिक नुकसान करून त्यांच्या बालमनावर विपरीत परिणाम करणाऱ्या शिक्षक अनंत वर्मा यांच्यावर शिक्षण विभागाने त्वरित निलंबनाची कार्यवाही करून तातडीने गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्याची मागणी पालकवर्गाकडून करण्यात आल्यानंतर गट शिक्षण अधिकारी कार्यालया कडून सदर मद्यपी शिक्षिकाविरुद्ध निलंबनाची कारवाई करण्यासाठी जिल्हा परिषदेला प्रस्ताव पाठिवण्यात येणार असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी संतोष शेटकार यांनी दिली. शेकापूर येथील जिल्हा परिषद शाळेवर कार्यरत शिक्षक अनंत वर्मा यांनी दारू पिऊन धिंगाणा घातल्याचा प्रकार समजल्यानंतर मा. शिक्षणाधिकारी यांच्यासोबत चर्चा करून सदर मद्यपी शिक्षकाच्या निलंबनाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. येत्या सोमवारी हा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे सादर करण्यात येईल अशी माहिती मिळाली आहे.

फारुख शेख

मुख्य संपादक Star Tv 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!