राजकीय

राज्यातील पाहिला अपक्ष उमेदवार मलकापुरात बिनविरोध विजयी

ना मतदान झाले, ना मतमोजणी; त्याआधीच अपक्ष उमेदावारानं मैदान मारलं

मलकापूर – राज्यातील पाहिला अपक्ष उमेदवार बुलडाणा जिल्ह्यातील मलकापुरात विजयी झाला आहे. मतदान न होताच नगरसेवक पदाची माळ गळ्यात पडली आहे. यानंतर विजयी मिरवणूक, ढोल-ताशे, जल्लोष, फटाके वाजवत समर्थकांनी जोरदार जल्लोष केला आहे..

 अंतिम मुदतीत खोऱ्याने उमेदवारी अर्ज दाखल झाले. अध्यक्ष व नगरसेवक पदासाठी हजारोच्या संख्येत दाखल हजारो उमेदवारी अर्जाची दमछाक करणारी मॅरेथॉन छाननी मंगळवारी, १८ नोव्हेंबर रोजी आटोपली.

मतदान २ डिसेंबरला सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५. ३० वाजे दरम्यान पार पडणार आहे. यानंतर ३ तारखेला सकाळी १० वाजेच्या आसपास मतमोजणी सुरु होऊन निकाल घोषित होणार आहे. त्यामुळे कुणीतरी त्या अगोदरच निवडून आलंय आणि त्यांची विजयी मिरवणूक देखील निघाली असं म्हणता, हे कसे शक्य आहे? पण हे खरोखर घडलयं.

हा राजकीय चमत्कार घडला मलकापूर पालिकेच्या प्रभाग १४ ‘अ’ मध्ये. झालेल्या छाननीअंती ही लक्षवेधी अशी राजकीय घडामोड घडली. आंबेडकरी चळवळीतून तयार झालेले भाई अशांत वानखेडे हे प्रभागाचे एकमेव वैध उमेदवार ठरले. त्यांचा बिनविरोध विजय झाला आहे. विरोधी उमेदवाराच्या अर्जसोबत अर्ज एबी फॉर्म नसल्याने छाननीवेळी अपात्र ठरला आणि निकाल स्पष्ट झाला.

छाननी प्रक्रियेसाठी मलकापूर येथील निवडणूक कार्यालयात सकाळपासूनच मोठी गर्दी आणि उत्सुकता होती. मात्र, विरोधी अर्ज बाद झाल्याची घोषणा होताच भाई वानखेडे यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचा जल्लोष उसळला. ढोल–ताशे, जल्लोष, फटाके अशा वातावरणात अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला.

विजय घोषित झाल्यानंतर सर्वप्रथम समर्थकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. समता, सामाजिक निष्ठा आणि न्यायमूल्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा हा क्षण अनेक समर्थकांच्या डोळ्यांत अभिमानाचा प्रकाश झळकवणारा ठरला.

यानंतर शहरात भव्य विजयरॅली काढण्यात आली. युवा वर्ग, महिला कार्यकर्त्या, ज्येष्ठ नागरिक आदींचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. शहरातील विविध चौकांत समर्थकांकडून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. नागरिकांनी भाई वानखेडे यांचे पुष्पहार आणि घोषणांनी स्वागत केले

गेल्या काही वर्षांत प्रभागातील स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते-विकास, तक्रारनिवारण आणि सर्वसमावेशक प्रभाग उभारणीसाठी भाई अशांत वानखेडे यांनी दिलेल्या सातत्यपूर्ण सेवेमुळेच हा बिनविरोध विजय शक्य झाल्याची प्रतिक्रिया समर्थकातून उमटत आहे.

राज्यातील २४६ पालिका व ४२ नगर पंचायतच्या निवडणुका होऊ घातल्या आहे. यासाठी सदस्य पदासाठी लाखो अर्ज आले आहे. बुलढाणा जिल्ह्यात ११ पालिकांच्या २८६ जागासाठी २५४१ अर्ज प्राप्त झाले. यासह लाखो उमेदवाररांचे भावितव्य टांगणीला लागले असतांना मलकापुरात वानखेडे यांनी मारलेली अविरोध बाजी हा पाहिला विजय ठरावा.

फारुख शेख

मुख्य संपादक Star Tv 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!