संविधान वाचवण्यासाठी कॉग्रेस मजबूत करण्याची गरज ; संदेशजी आंबेडकर
कासम भाई गवळी व त्यांच्या उमेदवाराच्या पाठीमागे खंबीरपणे उभे रहा

बुलडाणा ( मेहकर ) – देशाचे संविधान वाचवण्याच्या लढ्यात कॉग्रेसपक्षाला मोठी भूमिका बजावायची आहे. त्यासाठी कॉग्रेस पक्ष संघटन मजबूत करा, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू संदेशजी आंबेडकर यांनी मेहकर शहरात नगरपरिषद निवडणूकीच्या अनुषंगाने उमेदवारांच्या प्रचारा दरम्यान केले. 
मेहकर नगरपरिषदेच्या निवडणुकीत कॉग्रेसपक्षाचे नगराध्यक्ष पदासाठी उभे असलेले कासमभाई गवळी व त्याच्या सोबत असलेले सर्व प्रभागांमधील उमेदवारांच्या प्रचारासाठी जनसमुदायांना संबोधित करण्यासाठी संदेशजी आंबेडकर मेहकर शहरात आले होते. त्यावेळी संदेशजी आंबेडकर म्हणाले की, भारताला एक राष्ट्र म्हणून उभे करण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान अनन्य साधारण असेच आहे. तसेच आजच्या परिस्थितीत संविधान वाचविण्यासाठी तुम्हा आम्हाला एकत्रित लढा उभारुन कॉग्रेसपक्ष मजबूत करण्याची गरज आहे. आज होऊ घातलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत कॉग्रेसपक्षाचे नगराध्यक्ष पदासाठी कासमभाई गवळी व प्रभाग क्रमांक ९ मधील सुनिता संजय ढाकरके व वैभव गिरीश उमाळकर यांच्या प्रभागात कॉर्नर बैठकीत उपस्थित जनसमुदायांना संबोधित करतानी संदेशजी आंबेडकर बोलत होते. यावेळी कॉग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटनीस श्यामभाऊ उमाळकर, प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मनदादा घुमरे, जेष्ठ नेते विठ्ठलदादा ढाकरके, पक्षनेते अॅड अनंतराव वानखेडे, सेवादलचे प्रदेश सरचिटनीस शैलेश बावस्कर, जिल्हा सरचिटनीस कलीमखान, शहर प्रमुख पंकज हजारी, कॉग्रेसपक्षाचे नगराध्यक्ष पदासाठी उभे असलेले कासमभाई गवळी, संजय विठ्ठल ढाकरके, प्रभागामधील उमेदवार सौ. संगीता संजय ढाकरके, वैभव गिरीश उमाळकर यांच्यासह प्रत्येक प्रभागांमधील उमेदवार यावेळी उपस्थित होते. त्यावेळी यापूढे बोलताना संदेशजी आंबेडकर म्हणाले की, कॉग्रेसचे हात मजबूत करण्यासाठी, या नगरपरिषदेच्या निवडणुकीत कॉग्रेसपक्षाचे नगराध्यक्ष पदासाठी उभे असलेले कासमभाई गवळी आणि प्रभागांमधील उमेदवार असलेले, शितल किशोर धोंडगे, प्रा. संजय वानखेडे, कल्पनाताई जगन्नाथ निकस, अल्काताई शेषराव लंबे, मुजीब हसन कुरेशी, मंगला सुरेश मानवतकर, मुजीब खान वली मोहम्मद खान, जमनबाई पिरु गवळी, महेबुब जुम्मा गवळी, अंजूम बानो अख्तर कुरेशी, अनिल निळकंठ चांगाडे, रेखा प्रल्हाद कानोडजे, मोहम्मद अलीम ताहेर, शबनुर बी शेख रहिस कुरेशी, विजय तेजराव म्हस्के, शितल लक्ष्मन जाधव, सुनिता संजय ढाकरके, वैभव गिरीश उमाळकर,विमल गजेंद्र माने, प्रेरणा स्मित सावजी, शांता गणेश लष्कर , समाधान परमेश्वर बोडखे, विजय दत्तात्रय वायाळ, शोभा सुरेश वानखेडे, निलीमा शरद सोमन, माया पवन डोगंरदिवे, या सर्व प्रभागांमधील उमेदवारांना भरघोस मतानी विजयी करा असे आवाहन संदेशजी आंबेडकर यांनी केले. यावेळी प्रदेश सरचिटनीस श्यामभाऊ उमाळकर, प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मनदादा घुमरे, पक्षनेते अॅड अनंतराव वानखेडे यांनी उपस्थित जनसमुदायांना संबोधित करतानी कॉग्रेसपक्षाच्या सर्व प्रभागांमधील उमेदवारांच्या पंजा या निशाणीवरचे बटन दाबून या सर्वांना जास्तीत जास्त मतानी विजयी करा असे आवाहन केले. सदर कॉर्नर बैठकीचे सुत्रसंचालन पंकज हजारी यांनी केले तर आभार वैभव उमाळकर यांनी मानले. भव्य स्वागत आणि समाजबांधवाची मोठी गर्दी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू संदेशजी आंबेडकर मेहकर शहरात प्रथमच नगरपरिषदेच्या प्रचारादरम्यान आले होते. त्यावेळी शहरातील मोठ्या प्रमाणात समाजबांधव संदेशजी आंबेडकर यांना पाहण्यासाठी आणि त्यांचे दर्शन घेण्यासाठी व त्यांच्या सोबत फोटो सेल्फी घेण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती. यावेळी कडाक्याच्या थंडीतही शहरातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



