क्राईम

बुलडाण्यात 5 पोलीस कर्मचाऱ्यांची चोरांनी घरे फोडली

बुलडाणा – जिल्हा मुख्यालय तथा पोलीस दलाचे देखील मुख्यालय असलेल्या बुलढाणा शहरात अज्ञात चोरांच्या टोळीने पोलिसांच्या घरांना लक्ष्य बनवून पोलिसांसमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे. या टोळीने चक्क अत्यंत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या पोलीस वसाहतीत मोठा डल्ला मारला. पोलीस कर्मचाऱ्याच्या सरकारी घरात त्यांनी अत्यंत शांत चित्ताने आणि सुनियोजितपणे हात साफ करीत चार ते पाच कनिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्याच्या घरातील रोख रक्कम, किंमती वस्तू आणि सोन्या चांदीचे दागिने बेमालूम रित्या लंपास केले. प्राथमिक माहितीनुसार किमान पाच पोलिसांच्या घरात घुसून चोरांनी कमी अधिक २० लाखांचा मुद्देमाल लांबवला. बुलढाणा पोलीस वसाहती मध्ये पाच ठिकाणी चोरी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. शनिवारी, ६ डिसेंबर रोजी ही बाब उघडकीस आल्यावर पोलीस लाईनमध्ये खळबळ उडाली. वसाहतीत राहणारे पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या परिवारात चोरीची चर्चा होती. ही बातमी शहरात वाऱ्याच्या वेगाने पसरली. यामुळे अज्ञात चोरांच्या सुसज्ज टोळीने थेट पोलीस दलाला आव्हान दिल्याचे चित्र आहे. चोरीची घटना समोर आली आहे. यामध्ये पैसे व दागिन्यांचा समावेश आहे. चोरांनी जवळपास वीस लाखांची चोरी झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यामध्ये एएसआय वारे, पोलिस कॉन्स्टेबल रुबीना पटेल यांच्यासह इतरांच्या घरी चोरी झाली आहे. या घटनेमुळे बुलढाणा शहरात खळबळ उडाली आहे. पोलिस व फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बुलढाणा शहर पोलिस करीत आहे. बुलढाणा शहरातील चिखली राज्य मार्गावर असलेल्या देवीच्या मंदिर परिसरात पोलीस वसाहत आहे. याला लागूनच जिल्हा पोलीस दलाचे नियंत्रण करणारे पोलीस अधीक्षक कार्यालय आहे. तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे शासकीय निवासस्थाने आहे. तसेच याला लागूनच बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाणे आणि बुलढाणा सायबर पोलीस ठाणे देखील आहे. बुलढाणा चिखली हा राज्य मार्ग असून रात्रभर वाहतूक सुरु असते. पोलीस लाईन म्हटल्यावर तिथे राहणारे सर्वच पोलीस दादा वा पोलीस ताईच आहे. यामुळे एवढ्या कडक व चोरांच्या दृष्टीने धोकादायक परिसरातून चोरी करून चोरांनी पोलिसांची डोकेदुखी वाढविली आहे.

फारुख शेख

मुख्य संपादक Star Tv 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!