क्राईम

लग्न झालं अन् सासरी निघाली, वाटेतच नवरी गायब

चहासाठी थांबले अन् नवरी पळाली, नवरा डोक्याला हात लावून बसला

परभणी जिल्ह्यातून एक आगळा वेगळा प्रकार उघडकीस आला आहे. विनालग्न तरूणांना लग्नासाठी गळ घालून फसवणारी एक टोळी सक्रिय असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील एका तरूणाला परभणीच्या पालम येथील तरूणीनं जाळ्यात ओढून फसवलं. तिनं तरूणासोबत लग्न केलं. मात्र, लग्नानंतर पु्ण्याकडे जात असताना अंबाजोगाई येथे नवरी दागिने घेऊन पसार झाली. या फसवणुकीनंतर नवरदेवाने पालम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी दोन महिलांना अटक केली. सध्या इतर आरोपींचा शोध सुरू आहे. पुणे येथील किरण रोहिदास मोरे यांचे लग्न जमवण्यासाठी त्यांचे कुटुंब परभणीच्या पालम येथील काही व्यक्तींच्या संपर्कात आले होते. विनायक जाधव, रेखा सूर्यवंशी, रंजना मोरे, नवनाथ बंडगिरे आणि प्रवीण कानेगावकर यांनी मध्यस्थी करत मुलगी त्यांना दाखवली. या टोळीनं मुलीचा बोगस आधार कार्ड तयार केला. तसेच मुलगी पालम येथील असल्याचं भासवले. मुलगी पसंत झाल्यानंतर ९० हजार रोख, ३५ हजारचे मंगळसूत्र तसेच इतर दागिने, असे एकूण तीन लाख २५ हजार रुपये घेऊन मुलीचे लग्न लावून देण्याचे ठरले. ठरल्याप्रमाणेच दुपारी दीड वाजता पालमच्या केरवाडी शिवारातील हनुमान मंदिरासमोर, पाहुणे मंडळींच्या उपस्थितीमध्ये हा विवाह सोहळा संपन्न झाला. नवदाम्पत्य आपल्या मूळ गावी पुणे येथे जात असतानाच अंबाजोगाई येथे चहा पिण्यासाठी उतरलेल्या नवरीने पाठीमागून आलेल्या गाडीत बसत धूम ठोकली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मुलाने कुटुंबासह पालम पोलीस ठाणे गाठले आणि गुन्हा दाखल केले या प्रकरणात एकूण ११ जनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यात याच विवाह सोहळ्याला सहभागी असणाऱ्या दोन महिलेला पालम पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.

या घटनेमुळे, ग्रामीण भागातील तरुण-तरुणींच्या लग्नाच्या अडचणीचा फायदा घेऊन फसवणूक करणाऱ्या टोळ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

फारुख शेख

मुख्य संपादक Star Tv 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!