युवा ‘धुरंदर’ नेतृत्व ‘उबेद अली खान’ यांचा दणदणीत विजय

फारुख शेख ( 9923234500 )

चिखली नगरपरिषद निवडणुकीत नगरसेवक पदासाठी आपल्या नेतृत्वाचा ठसा उमटवत युवा धुरंदर नेतृत्व उबेद अली खान उर्फ भाईजान यांनी प्रभाग 7 मधून दणदणीत विजय मिळवला आहे. प्रचंड जनसमर्थनाच्या जोरावर त्यांनी प्रतिस्पर्ध्याचा पराभव करत.

विजयाची पताका फडकावली आहे. निवडणूक प्रचारादरम्यान उबेद अली खान उर्फ भाईजान यांनी युवक, महिला, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांशी थेट संवाद साधत विकासाचा ठोस आराखडा मांडला होता. स्वच्छ प्रभाग, मूलभूत सुविधा, शिक्षण-आरोग्य सुधारणा आणि युवकांना रोजगाराच्या संधी देण्यावर त्यांनी भर दिला. याच विश्वासामुळे मतदारांनी त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी केले. विजयानंतर प्रतिक्रिया देताना उबेद अली खान म्हणाले, “हा विजय माझा नसून प्रभागातील मायबाप जनतेचा आहे. जनतेने दिलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. सर्वांना सोबत घेऊन प्रभागाचा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करेन.” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. उबेद अली यांच्या विजयामुळे समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण असून समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला. त्यांच्या या यशामुळे चिखलीच्या राजकारणात एका यूवा नेतृत्वाला नवे बळ मतदार राजानी दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *