किन्होळा येथे सांडपाणी व्यवस्थापन योजनेचे तीन तेरा
एकाच दिवशी शेड तयार करून पाया न खंदता ओल्या जागेवर गिट्टी टाकून त्यावर बेड टाकले

काम नित्कृष्ट दर्जाचे करून ठेकेदार बिलं काढायच्या तयारीत 
फारूख शेख ( 9923231331 )
किन्होळा – बुलडाणा जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 चे कलम 125 प्रमाणे लेखासहिता नियम चार परिशिष्ट दोन ग्रामविकास व जलसंधारण विभाग शासन निर्णय क्रमांक झेडपीए 2016 प्रक 56 वित्त नऊ दिनांक 17 ऑक्टोंबर 2017 कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती लेखासंहीता नियम 1968 चे नियम परिशिष्ट दोन अन्वये असलेल्या अधिकाराचा वापर करून उपविभागीय अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग चिखली यांनी प्रस्तावित केलेल्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत किन्होळा तालुका चिखली जिल्हा बुलढाणा येथील सांडपाणी व्यवस्थापन कामास 21 लाख 80 हजार 423 कामाची मान्यता दिली आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील किन्होळा ग्रामपंचायत हद्दीत पुन्हा 21 लाख ऐनशी हजार चारशे तेवीस रुपयांच्या सांडपाणी व्यवस्थापन योजनेचे कामात तुफान भ्रष्टाचार झाले आहे. होय याच गावात काही महिन्यापूर्वी 14 लाख चाळीस हजार रुपयाचे घनकचरा व्यवस्थापन योजनेचे काम करण्यात आले आहे. घनकचरा व्यवस्थापन योजना फक्त नावालाच होती.. लाखों रुपये निधी खर्च करून सुद्धा घनकचरा व्यवस्थापन योजना फक्त नावालाच.. घनकचरा शेड पासून 100 फूट अंतरावर पैनगंगा नदी आहे. किन्होळा गावातील कचरा गावात फिरणाऱ्या घंटागाडीने जमा करून पैनगंगा नदीत फेकल्या जात आहे. याच नदीच्या काही अंतरावर पुढे एक विहिर आहे. गावात पिण्यासाठी पाणी याच विहिरीतून गावात पाणी पुरवठा होतो. पुढे ही नदी सवना मार्गे पेठ,आणि पेनटाकळी प्रकल्पात जाते. गावातील घान आणि कचरा किन्होळा येथील नदीतून पुढे जात आहे. या कचऱ्याची शासनाने मार्ग काढून विल्हेवाट लावावी अशी चर्चा गावात रंगली आहे. आता जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे पुन्हा एक नवीन सांडपाणी व्यवस्थापन योजनेचे काम सुरु करण्यात आले आहे. या कामाचे कंत्राटदार यांनी एकाच दिवसात शेड तयार केले आहे. ज्या ठिकाणी हा काम सुरु करण्यात आला आहे त्या ठिकाणी गावातील अनेक नाल्यांचा सांडपाणी याच मोकळ्या जागेवरून अनेक वर्षांपासून जात आहे. सदर कामाच्या ठिकाणी 12 महिने ओली जागा, डबके साचले असतात. ठेकेदारने एकचं दिवशी शेड तयार केले आणि चार पाच दिवसांनी शेड जवळ कोणत्याही प्रकारचा खोदकाम न करता ओल्या जागेत गवत असलेल्या ओल्या जागेत त्यावर खडी टाकून त्यावर थातूर मातुर बेड टाकून दिले आहे. सदर शेड अंदाजे 14 बाय 28 चा असून त्याला कोणताही पाया न खंदता बोगसरित्या काम केले आहे. 21 लाख ऐनशी हजार चारशे तेवीस रुपयांच्या सांडपाणी व्यवस्थापन योजनेच्या कामात पायाच नसून वरील काम कसे टिकणार, या कामाची मटेरियल टेस्टिंग रिपोर्ट व्हायला हवी. तसेच कंत्राटदार आणि इंजिनिअरची चौकशी होऊन सदर कामाचे देयके थांबवण्यात यावे. सदर काम ज्या ठिकाणी करण्यात आले याची चौकशी व्हावी अशी मागणी गावात होतं आहे.



