ब्रेकिंग न्यूज

व्हॉईस ऑफ मिडीया संग्रामपुर तालुकाध्यक्ष पदी मिर मकसुद अली

  • बुलडाणा [प्रतिनिधी ] व्हॉईस ऑफ मिडीया संग्रामपुर तालुकाध्यक्ष नारायण सावतकार यांनी राजीनामा दिल्यानंतर नविन तालुकाध्यक्ष पदावर मिर मकसुद अली मिर मुज़फ़्फ़र अली यांची नियुक्ती बाबत व्हॉईस ऑफ मिडीया पदाधिकाऱ्यांच्या सर्वानुमते वरवट बकाल शिक्षक पतसंस्था सभागृहात आयोजीत बैठकी प्रसंगी ठराव घेऊन वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना कळविले व्हॉईस मिडीया बुलडाणाच्या वतीने पत्रकार भवन येथे आयोजीत पत्रकार व कुटुंबांतील सदस्यांसाठी मोफत नेत्रतपासणी व शस्त्रक्रिया शिबीरा प्रसंगी छोटे खानी कार्यक्रमात व्हॉईस ऑफ मिडिया महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के , राज्य कोअर कमेटी सदस्य अरुण जैन , सिद्धार्थ आराख , जेष्ठ पत्रकार भाऊ भोजने , रमेश लहाने , माजी व्हॉईस ऑफ मिडीया जिल्हाध्यक्ष कृष्णा सपकाळ , माजी जिल्हाध्यक्ष लक्ष्मण बगाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत व्हॉईस ऑफ मिडीया बुलडाणा जिल्हाध्यक्ष वैभव मोहिते यांनी व्हॉईस ऑफ मिडीया संग्रामपुर तालुकाध्यक्ष पदी मिर मकसुद अली मिर मुज़फ्फर अली यांच्या नावाची घोषणा केली व उपरोक्त उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मिर मकसुद अली यांचा गुलपुष्प देऊन सत्कार करण्यात आला यावेळी व्हॉईस ऑफ मिडीया जिल्ह्यातील पदाधिकारी , सर्व तालुकाध्यक्ष व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फारुख शेख

मुख्य संपादक Star Tv 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!