शैक्षणीक

जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शन जि. प. शाळा डोंगरखंडाळा चे शिक्षक सय्यद जमिल सरांचे यश

प्रतिनिधी – यासिन शहा 

बुलडाणा – शिक्षण विभाग जिल्हा परिषद बुलढाणा, जिल्हा विज्ञान संघटना बुलढाणा व विवेकानंद विद्या मंदिर ज्युनियर कॉलेज हिवरा आश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने ५३ वे बुलढाणा जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शनी दि. ०६ व ०७ जानेवारी २०२६ रोजी विवेकानंद विद्यामंदिर व ज्यूनियर कॉलेज हिवरा आश्रम ता. मेहकर जि. बुलढाणा येथे आयोजित केले होते. ५३ वे बुलढाणा जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शनी मध्ये बुलढाणा जिल्हयातील सर्व तालुक्यातून प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक प्राप्त केलेले विद्यार्थी प्राथमिक व माधामिक गट तथा तालुक्यात शैक्षणिक साहित्य निर्मिती मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केलेले शिक्षक सहभागी होत असतात. शैक्षणिक साहित्य निर्मिती मध्ये जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा डोंगर खंडाळा येथील शिक्षण सय्यद जमिल सय्यद बशीर यांनी तयार केलेले मनोरंजक गणितीय मॉडेल या साहित्यास जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळाला असून त्यांचा निवड राज्य स्तरीय विज्ञान प्रदर्शन नागपूर साठी झाली असून बक्षीस समारंभ कार्यक्रमात शिक्षणाधिकारी प्राथमिक श्री पाटील, प्राचार्य श्री भटकर, उपशिक्षणाधिकारी श्री मुंडे, जिल्हा विज्ञान पर्यवेक्षक श्रीमती उबरहंडे, विज्ञान संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा संघटनेचे सदस्य यांचा हस्ते प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सदरील यशाबद्दल शा.व्य. स .अध्यक्ष गणेश काकडे, डोंगर खंडाळा ग्रापंचयत सरपंच कु . प्रजाताई कांबळे, उपसरपंच श्याम सावळे, सुनिल चव्हाण, गजानन सावळे, शा. व्य. समिती सदस्य, ग्रामपंचाय सर्व सदस्य तथा ग्रामस्थ यांनी शाळेत स्वागत केले. सय्यद सरांनी आपल्या मनोगतात शाळेच्या मुख्याधापिका पुष्पा गुळवे, जेष्ठ शिक्षक आराख सर, जाधव मॅडम , आराख मॅडम व जाधव सर यांच्या सहकार्य व मार्गदर्शनाबद्दल आभार व्यक्त व भविष्यात आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांना देखील राज्य स्तरापर्यंत नेण्याचा निर्धार बोलून दाखवला.

फारुख शेख

मुख्य संपादक Star Tv 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!