महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक अधिकारी कर्मचारी असोसिएशन, बुलढाणा जिल्हा नवीन कार्यकारिणी गठीत
जिल्हा अध्यक्षपदी रियाज शेख, जिल्हा उपाध्यक्ष पदी तौफिक अहेमद

बुलडाणा – महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक अधिकारी कर्मचारी असोसिएशन, मुंबई जिल्हा शाखा बुलढाणा यांची नवीन जिल्हा कार्यकारिणी गठीत होऊन विविध पदांवर सक्षम, अनुभवी व समाजाभिमुख नेतृत्वाची निवड करण्यात आली आहे, ही बुलढाणा जिल्ह्यासाठी अत्यंत आनंदाची व अभिमानाची बाब आहे.
या कार्यकारिणीत बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी मा. रियाज शेख यांची निवड करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे जिल्हा कार्याध्यक्षपदी शेख अकील शेख इब्राहिम (उपशिक्षणाधिकारी, प्राथमिक – जिल्हा परिषद बुलढाणा), जिल्हा सचिवपदी सय्यद अकबर सय्यद मोहम्मद, सहसचिवपदी सय्यद रफिक सय्यद रशीद यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेच्या उपाध्यक्षपदी मा. उमेश जैन उपशिक्षणाधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा, तोफिक अहमद अब्दुल रफिक, इब्राहिम खान, हबीबुल्ला खान, आगामीया शाह, बिस्मिल्ला शेख, प्रेमानंद वानखेडे व रसोद्दीन काजी यांची निवड करण्यात आली आहे. ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून शेख चांद शेख गुलाब साहेब, वासिक नवेद साहेब यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटकपदी, संगीता कासारे, भावना चुडीवाल, अजीज सर, प्रा. तनजीम हुसेन यांची निवड करण्यात आली असून, खजिनदारपदी सय्यद फुरकान सय्यद मर्दान व सतीश जगदीश बेलोकार यांना जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच विधी सल्लागारपदी एडवोकेट शेख सलीम शेख मोहम्मद, एडवोकेट शेख सादिक शेख मोबीन यांची निवड करण्यात आली आहे. नवीन कार्यकारिणीतील सर्व पदाधिकारी हे अनुभवी, कर्तव्यनिष्ठ व अल्पसंख्यांक अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत नेहमीच संवेदनशील भूमिका घेणारे असल्याने, त्यांच्या नेतृत्वाखाली संघटना अधिक मजबूत होईल, अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडले जातील आणि संघटनात्मक कार्याला नवी दिशा मिळेल, असा सर्वांना विश्वास आहे. या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा! त्यांच्या कार्यकाळात संघटना उत्तरोत्तर प्रगती करेल व अल्पसंख्यांक समाजाच्या हितासाठी उल्लेखनीय कार्य घडो, हीच सदिच्छा अभिनंदन! अभिनंदन!! अभिनंदन!!!