भरधावं कार विहिरीत कोसळली, चिमुरड्यांसह एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू

नाशिक येथील शिवाजीनगर परिसरात एका मंगल कार्यालयात खासगी क्लासचे स्नेहसंमेलन आटोपून घरी अर्टिगा कारने परत येत असताना जवळीलच शेतातील विहीरीत कार कोसळल्याचा प्रकार शुक्रवारी ३ एप्रिल रात्री १० वाजताच्या सुमारास घडला. या भीषण अपघातात कारमधून प्रवास करणारे नऊ जण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील नऊ जणांना अशाप्रकारे अपघातात प्राण गमवावे लागल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये दरगोडे कुटुंबातील दोन महिला आणि एक पुरुष यांच्यासह पंधरा वर्षाखालील सहा मुलांचा समावेश आहे. रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यात दिंडोरी शहरातील शिवाजीनगर भागात असलेल्या राजे बँक्वेट हाॅल व मंगल कार्यालयात शुक्रवारी सायंकाळी एका खासगी क्लासचे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनासाठी शहरासह आसपासच्या गावांतील विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते.रात्री १० वाजेच्या सुमारास स्नेहसंमेलन आटोपल्यानंतर इंदोरे तालुका दिंडोरी येथील एका कुटुंबातील नऊ जण अर्टिगा कारने घरी परतण्यासाठी निघाले. यावेळी मंगल कार्यालयाजवळच शेतात असलेल्या एका विहिरीत ती कार जाऊन कोसळली. या कारमध्ये दाम्पत्य, त्यांची कन्या असे एकाच कुटुंबातील तिघे जण, तर त्यांच्याच नात्यातील अन्य महिला, मुलगा, तीन मुली आणि लहानगी पुतणी असे दुसऱ्या कुटुंबातील मिळून नऊ जण होते.ही घटना समजल्यानंतर नगरपंचायतीचे अग्निशामक दल, आपत्ती व्यवस्थापनाचे पथक तसेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व मदतकार्यास सुरूवात केली. ही विहीर पाण्याने भरलेली असल्याने मदतकार्यात अडथळे निर्माण होत होते. रात्री उशिरापर्यंत बचाव कार्य सुरू होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *