नगरसेवक पदाचे उमेदवार सौ. मिरा विलास घोलप यांचा वचननामा

चिखली – प्रतिनिधी ( ईमरान शेख )

मतदार माय-बाप, बंधू-भगिनींनो-जय महाराष्ट्र! मी, शिवसेना पक्षाची अधिकृत उमेदवार, आपल्या प्रभाग क्रमांक ४ च्या सेवेसाठी निवडणुकीत उभी आहे. आजवर आपण अनेकांना संधी दिली या वेळेस मला एक संधी द्या, एवढीच नम्र विनंती. शिवसेनेचा खरा शिवसैनिक म्हणून माझे पती विलास पांडुरंग घोलप यांनी केलेल्या कामांची आजही सर्वत्र चर्चा होते, आणि तीच प्रेरणा घेऊन मी आपल्या सेवेसाठी सज्ज आहे. प्रभागातील प्रत्येक नागरिकाची समस्या म्हणजे माझी जबाबदारी आपल्या प्रभागाचा शाश्वत विकास हा माझा संकल्प ! आज प्रभागातील पिण्याचे पाणी, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, सार्वजनिक सोयी या अनेक मूलभूत प्रश्नांवर आपण अजूनही संघर्ष करीत आहोत. ही स्थिती बदलण्यासाठी, आपल्या प्रभागाला भयमुक्त व विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी मी शिवसेना पक्षाची उमेदवारी घेतली आहे. आता प्रभाग ४ ला बदलाची गरज नाही बदलाची वेळ आली आहे. मला निवडून दिल्यास, मी पुढील कामांना प्राधान्याने पूर्ण करणार आहे.

प्रभाग क्र. ४ साठी माझे १२ ठोस वचन

🟡 प्रभागातील प्रत्येक चौकाचे सुंदर सौंदर्कीकरणप्रभागाची ओळख बदलणारे आकर्षक चौक निर्माण.

🟡 मोकळ्या जागा व अतिक्रमित सरकारी जमिनी मुक्त करून विकसित करणार. प्रभागाचा विकास थांबवणाऱ्या अडथळ्यांना पूर्णविराम.

🟡 लहान मुलांसाठी व जेष्ठ नागरिकांसाठी आधुनिक गार्डन, कुटुंबांसाठी सुरक्षित आणि आनंददायी जागा.

🟡 युवांसाठी स्वातंत्र्य ग्रंथालय विद्यार्थ्यांसाठी अभ्यास, करिअर आणि स्पर्धा परीक्षांसाठी मोफत सुविधा.

🟡 तरुणांसाठी आधुनिक व्यायामशाळा, सुदृढ शरीर-सुदृढ प्रभाग !

🟡 प्रभागातील विविध देवस्थानांचा विकास, आस्था, संस्कार आणि परंपरांचा सन्मान.

🟡 शासनाच्या प्रत्येक योजनेची माहिती घराघरात, प्रत्येक पात्र कुटुंबाला योजनांचा तात्काळ लाभ.

🟡 नागरिकांच्या समस्यांवर ठाम, आग्रही भूमिकेतून निवारणसमस्या नाही, समाधान हेच प्रथम ध्येय.

🟡 लाडकी बहीण योजना प्रभागात सतत सुरू ठेवणार महिला सक्षमीकरणासाठी ठोस बांधिलकी.

🟡 भवानी गणेश मंडळ स्वागत कमान उभारणे परंपरेला आणि संस्कृतीला भव्य रूप.

🟡 कालिंका माता मंदिरासाठी जागा उपलब्ध करून देणे श्रद्धास्थळाचा विकास आणि सुविधा.

🟡 मांगीर बाबा मंदिरासाठी जागा उपलब्ध करून मंदिर उभारणे भक्तांसाठी सुसज्ज आणि सुरक्षित परिसर.

🟡 बैलजोडी परिसरात भव्य गार्डन उभारणे प्रभागात आणखी एक हिरवळ निसर्गासोबत प्रगती.

आपला आशीर्वाद – माझी ताकद २ क्रमांकावरील धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटण दाबून मला विजयी करा. आपल्या विश्वासाची परतफेड कामांमधूनच करणे हा माझा शिवसैनिक धर्म आहे. प्रभागाचा विकास, सुरक्षितता आणि स्वच्छता हाच माझा दृढ निर्धार !

            सौ. मिरा विलास घोलप

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *