राजकीय

निवडणुक वार्तांकनासाठी माध्यम प्रतिनिधींना प्रवेशिका द्या

बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी

बुलडाणा प्रतिनिधी – नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने प्रसार माध्यम प्रतिनिधींना मतदान केंद्रावरील प्रवेशासाठी प्रवेशिका देण्याची मागणी जिल्हा पत्रकार संघातर्फे बुलढाणा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे आज 18 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता करण्यात आली आहे.

निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता समोर आणण्यासाठी पत्रकार महत्वाचा घटक आहेत. पत्रकारांना मतदान केंद्रासाठी प्रवेशिके संदर्भात शासनाने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.त्यानुसार, शासनमान्य यादीवरील वृत्तपत्राच्या प्रतिनिधींनाच प्रवेशिका देण्याचे नमूद करण्यात आले आहे. परंतु,हा आदेश अनेक पत्रकारांसाठी अन्यायकारक ठरत असल्याने बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाने या आदेशा बद्दल नाराजी व्यक्त केली. साप्ताहिक, वेबपोर्टल, युट्यूब आणि सायंदैनिक जे शासनमान्य यादीवर जाहिरातीसाठी पात्र नाहीत मात्र, त्यांची नोंदणी भारत सरकारच्या आरएनआय दिल्लीकडे असून ते नियमित वृत्तकार्य करत आहे.त्यामुळे,अशा सर्व माध्यम प्रतिनिधींना प्रवेशिका मिळण्याची अपेक्षा आहे,असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

निवेदनावर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजीतसिंग राजपूत, जिल्हा सरचिटणीस कासिम शेख,गणेश निकम, ब्रम्हानंद जाधव,जितेंद्र कायस्थ,नितीन शिरसाट, युवराज वाघ,दिनेश मुढे, सुनील मोरे,डॉ.भागवत वसे,राम हिंगे, रहेमत अली,अजय राजगुरे, रहीम शाह,अभिषेक वरपे, सुरेखा सावळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनी उपरोक्त विषयासंदर्भात तातडीने दखल घेत जिल्हा माहिती अधिकारी यांना सूचना दिल्या. पत्रकारांच्या या मागणीचा विचार करून वरिष्ठ स्तरावरून निर्णय घेण्यात येईल आणि प्रवेशिका मिळतील,अशी अशा व्यक्त केली जात आहे.

फारुख शेख

मुख्य संपादक Star Tv 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!