क्राईम

पुणे हादरले! हुंड्यासाठी सासरच्या जाचाला कंटाळून सरपंचाच्या सुनेची आत्महत्या; पतीसह चौघांवर गुन्हा दाखल

पुणे : विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. उरुळीकांचन जवळील सोरतापवाडी येथे हुंड्याच्या कारणावरून सासरच्या मंडळींनी केलेल्या अमानुष छळाला कंटाळून एका विवाहितेने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. दीप्ती मगर-चौधरी (वय २६) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून, लोणी काळभोर पोलीस ठाण्यात पती, सासू आणि सासऱ्यांसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, दीप्ती यांचा विवाह काही वर्षांपूर्वी सोरतापवाडी येथील रोहन चौधरी याच्याशी झाला होता. विवाह थाटामाटात पार पडला होता आणि त्यावेळी दीप्ती यांच्या माहेरच्यांनी ५० तोळे सोने आणि ३५ लाख रुपये हुंडा दिल्याचे समजते. मात्र, लग्नानंतरही सासरच्यांची पैशांची हाव कमी झाली नाही. चारचाकीसाठी तगादा आणि गर्भपाताचा आरोप पती रोहन चौधरी, सासू सुनीता चौधरी (गावच्या सरपंच), सासरे कारभारी चौधरी (शिक्षक) आणि दीर रोहित चौधरी यांनी दीप्तीकडे चारचाकी गाडी घेण्यासाठी माहेरहून पैसे आणावेत, यासाठी तगादा लावला होता. पैसे न दिल्यास तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जात असे. इतकेच नाही तर, दीप्ती यांना गर्भपात करण्यासाठीही त्रास दिला गेल्याचा गंभीर आरोप माहेरच्यांनी केला आहे. सरपंचाच्या घरातच सुनेचा छळ विशेष म्हणजे, दीप्ती यांची सासू सुनीता चौधरी या गावाच्या सरपंच आहेत, तर सासरे शिक्षक आहेत. सुशिक्षित आणि प्रतिष्ठित कुटुंबातच सुनेचा असा अमानुष छळ झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. रोजच्या जाचाला आणि मारहाणीला कंटाळून अखेर दीप्तीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस कारवाई दीप्ती यांच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून लोणी काळभोर पोलिसांनी पती रोहन, सासू सुनीता, सासरे कारभारी आणि दीर रोहित यांच्याविरुद्ध हुंडाबळी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

फारुख शेख

मुख्य संपादक Star Tv 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!