युवक काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीस पदी बासिद जमादार
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्र

प्रतिनिधी – शेख ईमरान ( चिखली )
चिखली – युवक काँग्रेसच्या संघटनात्मक बळकटीसाठी जिल्हा पातळीवर महत्त्वाची नियुक्त्या करण्यात येत आहे. चिखली येथील काँग्रेसचे धडाडीचे पदाधिकारी अब्दुल बासीद जमादार यांची युवक काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुलभाऊ बोंद्रे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिकेत मापारी यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. पक्षाची विचारधारा तळागाळातील युवकांपर्यंत पोहोचवणे, युवकांच्या प्रश्नांना वाचा फोडणे तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे धोरण जनसामान्यांपर्यंत प्रभावीपणे मांडण्याची जबाबदारी पूर्ण ताकदीने पार पाडणार असल्याचे नवनियुक्त युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अब्दुल बासिद जमादार यांनी सांगितले. याप्रसंगी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रामभाऊ जाधव, शहर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल सवडतकर, डॉ. मोहम्मद इसरार, अथरुद्दीन काझी, अमीनखा उस्मानखा, खलील बागवान, सुरेश तात्या बोंद्रे, मनोज लाहुडकार, शकील भाई, ऍड. दिलीप पवार, एडवोकेट दिनेश जपे यांची उपस्थिती होती.



