सक्षम नेतृत्व, विकासाची हमी, प्रभाग 4 मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार सर्वसामान्य मतदार निशांत अंजुम शेख तौफिक यांच्या पाठीशी

चिखली नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्र. 4 (सर्वसाधारण महिला) या गटातून राष्ट्रवादी काँग्रेस (अजीत पवार) पक्षाकडून सौ. निशात अंजुम शेख तौफिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षनिष्ठा, सामाजिक कार्य आणि विचारशील नेतृत्व या तिन्ही गुणांचा संगम असलेल्या सौ. निशात अंजुम शेख तौफिक यांच्या उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे, हे विशेष ! समाजिक कार्याचा दिर्घकालीन वारसा असलेले मुस्लिम समाजातील सक्षम नेतृत्व करामत भाई यांचे राजकीय श्रेत्रात कार्यरत असलेले जेष्ठ चिरंजीव, युवा नेते शेख तौफीक यांच्या पत्नी सौ. निशात अंजुम शेख तौफिक यांना मिळालेली उमेदवारी ही महत्त्वाची असून त्याचा झंझावाती प्रचार सुरू झाला आहे.
शेख करामत यांचा राजकीय कार्यकाळ पाहता त्यांची पक्षनिष्ठता आणि तितकेच समाजाप्रति असलेले दाशीत्व वेळो वेळी सिध्द झाले आहे. प्रभाग क्रमांक 4 मधील उमेदवार सौ. निशात अंजुम शेख तौफिक यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडुन उमेदवारी जाहीर झाल्या नंतर त्यांचे सासरे शेख करामत यांनी प्रचार सुरु केलाआहे. सामाजीक क्षेत्रात कार्य करीत असतांना मुस्लीम सेवा संघ जिल्हा अध्यक्ष या नात्याने त्यांनी समाजातील न्याय प्रश्नांना वेळो वेळी वाचा फोडली आहे. नगर परिषद प्रशासना अंतर्गत प्रभागात झालेल्या विकास कामांमध्ये त्यांनी महत्वाची भुमिका बजावली आहे. युवा नेते शेख तौफिक शेख करामत यांनी सामाजीक क्षेत्रात आजपर्यंत विविधांगी कार्य केले आहे. बांधकाम कामगार योजनेचा लाभसर्वसामान्य कामगारांना कसा देता येईल या बाबत त्यांनी अग्रही भुमिका घेतलेली आहे. एकुणच या परिवाराची राजकीय व सामाजीक क्षेत्रातील पार्श्वभुमी पाहता शेख तौफिक यांच्या पत्नीस मिळालेली उमेदवारी ही आजपर्यंत केलेल्या कामाची निर्वीवाद पावती म्हणता येईल. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात दोघेही पिता पुत्र सक्रिय असून प्रभागातील नागरिकांशी थेट संपर्क साधून आहेत. सौ निशात अंजुम शेख तौफिक यांनी आपल्या पतीच्या कार्यात खांद्याला खांदा लावून सातत्याने सहभाग घेतला आहे. हे ही तितकेच महत्त्वाचे! राजकीय श्रेत्रात नव नेतृत्वाला संधी देण्याबाबतची प्रभागातील नागरिकांची भुमिका त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करीत आहे. एवढे मात्र खरे..!
प्रतिनिधी – ईमरान शेख



