
प्रतिनिधी – यासिन शहा
बुलडाणा – रमजानच्या पवित्र महिन्याची सुरुवात होताच, अश्मीरा यासिन शाह यांच्या लाडक्या मुलीने (वय १० वर्षे) आपला पहिला रोजा यशस्वीपणे ठेवला. ही छोटीशी मुलगी आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत उपवास करून राहिली आणि इफ्तारच्या वेळी कुटुंबासोबत आनंदाने उपवास ( रोजा ) सोडला. यामुळे कुटुंबात आणि आजूबाजूच्या लोकांमध्ये खूप आनंद आणि अभिमान व्यक्त होत आहे. “माझी मुलगी गेल्या काही दिवसांपासून रमजानच्या रोज्याची खूप उत्सुकता दाखवत होती. तिने स्वतःहून सांगितले की यावर्षी ती पहिला रोजा ठेवणार. आम्ही तिला थोडेसे समजावले की तिचे वय अजून लहान आहे, पण तिची इच्छाशक्ती आणि धैर्य पाहून आम्ही तिच्यावर विश्वास ठेवला. अल्लाहची मेहेरबानीने तिने पूर्ण दिवस उपवास केला आणि कधीही तक्रार केली नाही. मुलीने रोजा ठेवताना सकाळी पाच वाजता सहरी केली आणि संपूर्ण दिवस शांतपणे रोजा ठेवला. इफ्तारच्या वेळी तिने खजूर, पाणी आणि कुटुंबाने तयार केलेल्या विशेष पदार्थांसोबत उपवास तोडला.

तिने सांगितले, “मला रोजा ठेवायला खूप मजा आली. आता मी दररोज ठेवणार रोजा..!” इस्लामिक परंपरेनुसार, मुलांना १०-१२ वर्षांच्या वयापासून रोजा ठेवण्यास प्रोत्साहन दिले जाते, जेणेकरून ते हळूहळू धार्मिक जबाबदाऱ्या समजून घेतील. अश्मीरा या मुलीच्या या पहिल्या रोज्याने अनेकांना प्रेरणा मिळाली आहे. रमजान हा केवळ उपवासाचा महिना नाही, तर तो दया, क्षमा, एकता आणि चांगल्या गोष्टींसाठी प्रार्थना करण्याचा काळ आहे. या मुलीच्या पहिल्या रोज्यातील देशासाठी केलेल्या प्रार्थनेने अनेकांना प्रेरणा मिळाली आहे. अशा छोट्या हृदयातून निघणारी दुआ अल्लाहपर्यंत पोहोचो आणि देशाला नेहमीच आशीर्वाद मिळत राहो अशी दुवा अशमीरा हिने केली आहे.



