क्राईम

गोठ्यात सुरू होता अवैध गर्भपात केंद्र

एक संशयित बारावी पास, दुसरा पॅथॉलॉजी लॅबचा संचालक 3 महिला अटक

भोकरदन – मोबाईल ॲपच्या मदतीने गर्भलिंगनिदान करुन गर्भपात‎ करणारे मोठे रॅकेट जालना स्थानिक गुन्हे शाखा व‎ आरोग्य विभागाने उघडकीस आणले. भोकरदन ‎शहरपासून जवळच गवळीवाडी गावाच्या शिवारात ‎चक्क एका गोठ्यात हा प्रकार सुरु होता. यात दोघांना‎ अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तपासणीचे‎ साहित्य ,मोबाईल, गर्भपाताच्या गोळ्या जप्त केल्या ‎आहेत. भोकरदन शहरापासून जवळच असणाऱ्या गवळीवाडी‎ शिवारामध्ये एका पत्र्याच्या गोठ्यामध्ये हा प्रकार सुरु‎ होता. गेल्या अनेक महिन्यांपासून अवैधपणे गर्भलिंग‎निदान सुरू असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे ‎अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्यावरून ‎‎सायंकाळी जालना जिल्हा शल्यचिकित्सकांचे पथक व ‎‎स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने एकत्रितपणे येथे छापा ‎‎टाकला. यावेळी दोन संशयित आरोपींना अटक केली‎ आहे. यावेळी तीन महिला गर्भलिंग निदान करण्यासाठी ‎‎आलेल्या होत्या. धक्कादायक म्हणजे हे दोन्ही आरोपी ‎‎डॉक्टर नाहीत किंवा त्यांचे वैद्यकीय शिक्षण झालेले नाही. ‎‎यातील तरुण सतीश सोनवणे हा बारावी पर्यंत शिकलेला ‎‎आहे तर दुसरा संशयित केशव गावंडे हा भोकरदन ‎शहरातील तेजस पॅथॉलॉजी लॅबचा मालक आहे. जिल्हा ‎‎परिषद शाळेजवळच हा प्रकार सुरु होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस ‎निरीक्षक पंकज जाधव यांच्या ‎मार्गदर्शनामध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक ‎योगेश उबाळे यांच्या पथकाने ही कारवाई‎ केली. यामध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक‎ सचिन खामगळ, उपनिरीक्षक राजेंद्र वाघ ‎यांच्यासह आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचा‎ समावेश होता. गुप्त माहितीवरुन पोलिसांनी‎हे रॅकेट उद्ध्वस्त केले. यात आणखी काही‎ जणांचा समावेश असण्याची शक्यता व्यक्त‎ केली जात आहे. आरोपींकडून गर्भपाताच्या गोळ्या,‎गर्भलिंग निदान करण्यासाठी लागणारे‎ छोटे पोर्टेबल प्रोब मशीन, मोबाईल‎ अप्लिकेशन, टेस्ट ट्यूब इंजेक्शन आणि ‎मोबाईल हे साहित्य जप्त करण्यात आले‎ आहेत. घटनास्थळावरून या गोठ्याचा ‎मालक समाधान चोरमारे हा फरार आहे.‎भोकरदन-सिल्लोड रोडवर पासून ‎नांजावाडी आणि त्यापुढे दोन किमी‎ अंतरावर असलेल्या गवळीवाडी‎ शिवारात हा प्रकार सुरु हाेता.

फारुख शेख

मुख्य संपादक Star Tv 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!